LIKE ON FB

Friday, July 15, 2016

डाॅक्टरांनी फोन का नाही उचलला?

डाॅक्टरांनी फोन न उचलण्याच्या कारणांच्या काही शक्यता :-

डाॅक्टर दुसर्‍या फोनवर बोलत असू शकतात.

डाॅक्टर गाडी चालवत असू शकतात.

डाॅक्टर व्यवस्थित रेंज न येणार्‍या लिफ्टमधे असू शकतात.

डाॅक्टर टाॅयलेट / बाथरूममधे असू शकतात.

डाॅक्टर दुसरा पेशंट बघत असू शकतात.

डाॅक्टर आॅपरेशन थिएटरमधे वाॅश्डअप असू शकतात.

डाॅक्टर आयसीयू / आॅपरेशन थिएटरमधे एखाद्या प्रोसीजरमधे बिझी असू शकतात.

डाॅक्टर एखाद्या ह्रदय थांबलेल्या रुग्णाला सिपिआर देत असू शकतात.

डाॅक्टर एखाद्या अत्यवस्थ रूग्णाच्या नातेवाईकांना आजाराचे गांभिर्य, उपचारांची दिशा, परिस्थिती सुधारण्याची शक्यता वगैरे समजावून सांगत असू शकतात.

डाॅक्टर एखाद्या गंभिर रूग्णाला अँब्युलंसमधून शिफ्ट करताना माॅनिटर करत असू शकतात.

डाॅक्टर एखाद्या गेलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना ही दु:खद बातमी सांगत असू शकतात.

डाॅक्टर एखाद्या रूग्णाला नुकतेच निदान झालेल्या कॅन्सर वा अन्य दुर्धर आजाराची संवेदनशील बातमी सांगत असू शकतात.

डाॅक्टर स्वत: अपघातग्रस्त / आजारी / आॅपरेशन टेबलवर / आयसीयूमधे अॅडमिट असू शकतात.

डाॅक्टर हाॅस्पिटलवर चालून आलेल्या माॅबला तोंड देत असू शकतात.

डाॅक्टर स्वत:च्या आई ,वडिल ,नवरा / बायको ,मुलं ,भाऊ ,बहिण मित्र / मैत्रीण वगैरेंपैकी कुणाच्यातरी गंभीर आजारपणात धावपळ करत असू शकतात.

डाॅक्टर स्वत:च्या आई ,वडिल ,नवरा / बायको ,मुलं ,भाऊ ,बहिण मित्र / मैत्रीण वगैरेंपैकी कुणाच्यातरी निधनाच्या शोकात असू शकतात.

डाॅक्टर २ दिवसांच्या लागोपाठ ईमरजंसी ड्युटीनंतर निसर्गाने लादलेल्या निद्रेला वश झालेले असू शकतात.

डाॅक्टर फोनची रिंग ऐकु येणार नाही अशा डिजेछाप गोंगाटी मिरवणूकीतून रस्ता काढत असू शकतात.

डाॅक्टर सिविकसेंस नसलेल्या लोकांमूळे झालेल्या ट्राफिकमधे अडकलेले असू शकतात.

डाॅक्टर राजशिष्टाचारांतर्गत व्हिआयपी ड्यूटीवर असू शकतात.

एखादा ईमरजंसी रूग्ण अटेंड करतानाच्या गोंधळात डाॅक्टरांचा फोन कुठेतरी विसरलेला वा पडलेला असू शकतो.

अटेंड केलेल्या मेडिकोलिगल केसबाबत स्टेटमेंट देण्यासाठी डाॅक्टर कोर्टरुममधे असू शकतात.

हलगर्जीपणाच्या खर्‍याखोट्या आरोपासाठी डाॅक्टर पोलिसस्टेशन / अटकेत / कोर्टरुममधे असू शकतात.

डाॅक्टर स्वत:च्या लग्नासाठी बोहल्यावर ऊभे राहिलेले असू शकतात.

***
टीप :-

या शक्यतांमधे व्याख्यान देत/ऐकत असणे, अभ्यास करत असणे, जेवण करत असणे, व्यायाम करत असणे, मेडिटेशन / योगा करत असणे, सिनेमा / नाटक बघत असणे, सुटीवर असणे, मुलांचा अभ्यास घेत असणे वगैरे भारतीय राज्यघटनेने दिलेल्या (क्षुल्लक) अधिकारांच्या शक्यतांचा विचार करण्यात आलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.😊😊😊

posted from Bloggeroid

No comments:

Post a Comment

if you are a parent, please post query at www.kondekar.com
डॉं कोंडेकर संतोष वेंकटरमण@मुंबई